Tuesday 28 June 2016

मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडतील- मा.आमदार आशिषजी देशमुख (काटोल, नरखेड)

महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांना दि.21/06/2016 ते 24/06/2016 या कालावधित मूल्यवर्धन कार्यशाळा आयोजीत केली होती.या कार्यशाळेचा समारोप दि.24जून 2016ला मा.आमदार आशिषजी देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. या समारोपीय कार्यशाळेला उपस्थित डॉ.आयुश्री आ.देशमुख नागपूर जि.प.चे शिक्षण सभापती उकेशजी चौहान काटोल प.समितीचे  सभापती श्री संदिपजी सरोदे श्री भाऊसाहेब भोगे,संगीता घोडेकर मॅम (अधिव्याख्याता अभ्यासक्रम विकसन विभाग विदया परिषद पुणे) अशोकजी गोपाल,मिनल दशपुत्रे, रत्ना गोसावी, सचिनजी वाळुंजकर, बाळासाहेब ठोंबरे, गजानन देशमुख, अमितजी शिंदे तज्ज्ञ मार्गदर्शक (एस.एम.एफ.पुणे)दुरदर्शन चे सागर राठोड व सर्व मिडीया टीम पुणे) नागपूर जि.प.चे उपशिक्षणाधिकारी श्री. अनिल कोल्हे, दोन्ही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री उत्त्तम काकडे.,श्री जुमनाके साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी श्री जयराज गहलोद, श्री संतोषजी सोनटक्के, जिल्हा समन्वयक श्री गोपालजी घाडगे, मूल्यवर्धन उपक्रम काटोलचे तज्ज्ञ मार्गदर्शक राजू धवड, दिलीप  केने,  राजू तिजारे तसेच सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख तसेच व्ही.एस.पी.एम.पदाधिकारी अधिकारी व शिक्षक व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


सर्वप्रथम प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.मा.अध्यक्ष यांचे स्वागत झाल्यानंतर मा.आमदार आशिषजी देशमुख यांनी सर्व तज्ञ मार्गदर्शक व मिडीया टीम पुणे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.प्रास्ताविक श्री राजू धवड यांनी केले.व मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले.प्रशिक्षणार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मूल्यवर्धन कार्यक्रम भारतीय लोकशाही साठी पूरक व पोषक असा कार्यक्रम आहे.तसेच"आम्ही असे प्रशिक्षण पहिल्यांदाच अनुभवले,हे प्रशिक्षण इतर प्रशिक्षणा पेक्षा वेगळे होते,हे प्रशिक्षण अतिशय आनंददायी होते,अतिशय नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम आहे"
 संगीता घोडेकर, MSCERT पुणे यांनी व एस.एम.एफ.टीम, पुणे यांनी मूल्यवर्धन या उपक्रमाची वैशिष्टये सांगीतली. तसेच प.स.सभापती काटोल यांनी मुलांमधील सुप्त गुण विकसीत करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे असे सांगीतले.जि.प.शिक्षण सभापती यांनी मूल्यवर्धन हा उपक्रम मुलांचे भविष्य उज्वल करणारा आहे. असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार आशिषजी देशमुख यांनी शालेय विघार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार नागारीक व्हावेत व त्यांना मूल्यवर्धन या उपक्रमातून वारंवार संधी मिळाव्यात जेणेकरुन विद्यार्थी  हा देशाचे भवितव्य उंचावेल.अशी विचारधारा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  करतांना  दिलीप  केने  यांनी मूल्यवर्धनाचे महत्व विषद केले. मान्यवरांचे आभार रुबेन मॅम यांनी व्यक्त केले.व राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


No comments:

Post a Comment