Thursday 7 July 2016

मूल्यवर्धन दिन...

 जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा प.स.काटोल जि.नागपूर येथे 5 जुलै 2016 हा दिवस मूल्यवर्धन दिन म्हणून साजरा

महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा  ता.काटोल जि.नागपूर येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाचा २०१६ या सत्राचा ५ जुलै हा दिवस 'मूल्यवर्धन दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन मा.सरपंच व सर्व सन्माननीय सदस्य तसेच SMC पदाधिकारी व पालक यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम पारडसिंगा या ५००० लोकवस्ती असलेल्या गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पदाधिकारी, गावकरी, पालक,सर्व शिक्षक व मुले सहभागी झाली होती. यावेळेस विद्यार्थानी गीत गायन केले. घराघरात मूल्यवर्धन कार्यक्रम पोहचविण्यासाठी शाळेत गावाचा नकाशा काढून तेथे मुलांचे सहयोगी खेळ घेण्यात आले.यामध्ये तोल सांभाळू,कानगोष्टि हे खेळ घेण्यात आले.मान्यवरांनी मूल्यवर्धन  हा कार्यक्रम अतिशय पुरक व पोषक असा कार्यक्रम असून मूलांवर लहानपणी योग्य संस्कार केले तर त्याचे यश सध्याच्या व पुढील पिढीसाठी उपयुक्त आहे असे मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment