Monday 14 November 2016

Mulyavardhan Updates- November 2016

७ नोव्हेंबर २०१६ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये मूल्यवर्धनची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत शालेय शिक्षणमंत्री मा. श्री. विनोदजी तावडे, प्रधान सचिव श्री. नंदकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, शिक्षण आयुक्त श्री. धीरजकुमार, विद्यापरिषदेचे संचालक श्री. गोविंद नांदेडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये मूल्यवर्धन लवकरच महाराष्ट्रातील जिल्हापरिषदेच्या सर्व शाळांमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत ३४ क्लस्टरमध्ये जिल्हापरिषदेचे शिक्षक व CRC यांनी जी अनमोल कामगिरी बजावली आहे त्याबद्दल मा. मुख्यमंत्र्यांनी सर्वाना धन्यवाद दिले आहेत. 


८ नोव्हेंबर २०१६ - मा. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी जि. प. यवतमाल यांना मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती देताना जिल्हा समन्वयक बेले सर.  यवतमाल जिल्ह्यातील कोल्ही केंद्रातील मूल्यवर्धन उपक्रमाबाबत मा. शिक्षणाधिकारी साहेबांनी समाधान व्यक्त केले. तसेच हा कार्यक्रम यवतमाळात जिल्ह्यातील कोल्ही केंद्रात राबविल्या बद्दल मा. शांतीलाल मुथ्था सरांना शतशः धन्यवाद दिले व हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्य़ात राबवावा अशी विनंती केली कारण बालवयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धन कार्यक्रमातून जी मूल्ये रुजायला दिलेली आहे ती अतिशय उपयुक्त आहेत.
९ नोव्हेंबर २०१६ - दिनांक ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये मूल्यवर्धनची आढावा बैठक घेतली.  त्या संदर्भात विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या.




१४ नोव्हेंबर २०१६ -डोंगराला आग लागली पळा रे पळा हा खेळ खेळताना इयत्ता दुसरी व तिसरीचे विद्यार्थी.
शाळा - Z.P.PRI SCHOOL RAMRAONAGAR, Ghoti 2

१४ नोव्हेंबर २०१६ -दोरीउडीचा सहयोगी खेळ खेळताना विद्यार्थी.
शाळा - Z.P.PRI SCHOOL WAGHOBACHIWADI, Ghoti 2

१५ नोव्हेंबर २०१६ -काटोल आणि नरखेड (नागपूर)येथे प्रशिक्षकांच्या कार्यशाळेस सुरवात झाली. उद्घाटन प्रसंगी माजी कृषीमंत्री श्री.रणजीत देशमुख, मिनल मॅडम, व शिक्षक वृंद.


 १५ नोव्हेंबर २०१६ -काटोल आणि नरखेड (नागपुर) येथे प्रशिक्षक गटामधे सराव करताना.
१६ नोव्हेंबर २०१६ -सहयोगी खेळ - उभे कसे राहू?
शाळा - ZPPS VESURLE, Punas

१६ नोव्हेंबर २०१६ -दि १६/११/२०१६ रोजी सन्मानिय शांतिलाल मुंथ्था साहेब व टीम जि प शाळा आसरा जि अमरावती येथे भेट देवुन शिक्षकांशी हितगुज साधले.

१६ नोव्हेंबर २०१६ -मूल्यवर्धन उपक्रम काटोल व नरखेड येथे दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण केंद्रस्तरावर कसे दयायचे याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक.
१७ नोव्हेंबर २०१६ -वर्धा येथे मूल्यवर्धनचे संस्थापक मा. शांतीलालजी मुथ्था  साहेब, व सर्व टीम व गटशिक्षणाधिकारी श्री.अशोक कोडापे साहेब यांची भेट.


१७ नोव्हेंबर २०१६ -मूल्यवर्धन उपक्रम काटोल व नरखेड येथे तिसऱ्या दिवशी प्रशिक्षण केंद्रस्तरावर कसे दयायचे याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक  चालू असताना आमदार आशिष देशमुख,शांतिलाल मुथ्था व् इतर मान्यवर उपस्थित होते त्याचे क्षणचित्र.

१७ नोव्हेंबर २०१६ -मा.शांतिलालजी मुथ्था साहेब यांची वर्धा येथील झाडगाव केंद्रातील सर्व शिक्षकांसोबत चर्चा. कार्यक्रमाला मा. सूदर्शनजी,मा.फत्तेपुरीयाजी,मा.कांबे साहेब उपशिक्षणाधिकारी,मा.अशोक कोडापे गटशिक्षणाधिकारी,श्री.रवीन्द्र राठोड केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक यांची उपस्थिती.

१७ नोव्हेंबर २०१६ -उपक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थी
उपक्रम - माझ्या घरातल्यांना काय आवडते ?
इयत्ता - दुसरी
शाळा - Z.P. SCHOOL RAMINimgul

१७ नोव्हेंबर २०१६ -उपक्रम - आपण वेळेचा उपयोग कसा करतो?
शाळा - ZPPS Kurne No 2Punas
इयत्ता - दुसरी
१८ नोव्हेंबर २०१६ -जि प शाळा तळ्याचीवाडी येथे झालेल्या उपक्रमात राजा ओळखणे . साखळी सोडविणे . माझा परीसर स्वच्छता मोहीम .  या उपक्रमात  इ १ली ते  ४थी  सहभागी झाले.
शाळा - Z.P.PRI SCHOOL TALACHI WADIGhoti 2


१८ नोव्हेंबर २०१६ -उपक्रम - "असा मार्ग निवडला" - गोष्ट सांगणे व गटचर्चा करणे
शाळा - ZPPS SalumbreDarumbre
इयत्ता - तिसरी
























No comments:

Post a Comment