Wednesday 4 January 2017

Mulyavardhan Updates- January

२ जानेवारी २०१७  - मूल्यवर्धन आढावा बैठक  
Cluster - Shingve Tukai
District- Ahmednagar


२ जानेवारी २०१७  - 'तोल संभाळू' या सहयोगी खेळाचा आनंद घेणारे विद्यार्थी. 
शाळा - ZPPS PUNAS KOND
Cluster - Punas
District- Ratnagiri
उपक्रम -  सहयोगी खेळ 



२ जानेवारी २०१७  - वर्गशिक्षक श्री.सुरवसे 'माझ्या कुटुंबियांची कामे' हा उपक्रम घेताना. 
शाळा - ZPPS KHADAKWADI
Cluster - Kekarjawla
District- Parbhani
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  माझ्या कुटुंबियांची कामे
३ जानेवारी २०१७  - "फुग्याच्या खेळाचा" आनंद घेणारे विद्यार्थी . 
शाळा - Z.P.P.S. Shirsoli
Cluster - Shirsoli
District- Jalgaon
उपक्रम -  सहयोगी खेळ 

३ जानेवारी २०१७  - दिनांक ३ जानेवारी २०१७ रोजी मूल्यवर्धन आढावा कार्यक्रम संदर्भ बैठक केंद्रप्रमुख श्री.शेख सर यांनी घेतली. यावेळी मुख्याध्यापिका सौ. गोसावी व् केंद्र घोटी2 केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. 
Cluster - Ghoti  2 
District- Nashik
४ जानेवारी २०१७  - 'कमानीतून जाऊ' हा सहयोगी खेळ खेळणारे विद्यार्थी. 
शाळा - Z.P.PRI SCHOOL KHAMBALEWADI
Cluster - Ghoti  2 
District- Nashik
उपक्रम -  सहयोगी खेळ 


४ जानेवारी २०१७  - दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसोली येथे मूल्यवर्धन पालक सभा घेतली. शालेय समिती अध्यक्ष व सदस्य महिला उपस्थित होते. मूल्यवर्धन उपक्रम विषयी माहिती दिली.
Cluster - Shirsoli
District- Jalgaon




५ जानेवारी २०१७  - दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी मूल्यवर्धन आढावा कार्यक्रम शाळा घोटी मुली नं1केंद्र घोटी2 ता.इगतपुरी जि.नाशिक येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शांतीलाल मुथ्या फाऊंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष मा.श्रीं मुथ्था साहेब, जि.प.सदस्या मा.सेो.अल्काताई जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री.अहिरे साहेब, शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री.राकेश वाघचौरे, श्री किसनलाल पिचा,श्री व सौ भनसाळी, श्रीं.नंदकिशोर साखला,श्रीमती कुलकर्णी मॅडम,श्री.झरेकर,श्री.अकबर शेख केंद्रप्रमुख,श्री एन्.जे.मुसळे जिल्हा समन्वयक, सौ.स्मिता गोसावी मॅडम, सर्व शिक्षक,शा.व्य.समिती सदस्य व पालक,हे सर्व उपस्थित होते.
प्रथम मा.श्री.मुथ्था साहेब इ.1 ली ते 3रीच्या वर्गवार जाऊन मुलींशी मूल्यवर्धन उपक्रम घेऊन चर्चा केली.त्यांना मूल्यवर्धन विषयी जे अपेक्षित होते ते मुलींच्या तोंडून ऐकून त्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला.
मूल्यवर्धन दूत व इतर शिक्षकांचे मनोगत व चर्चा केली. मूल्यवर्धन उपक्रम आतिशय चंगला व भावी पिढी घडविव्यास मदत होईल.सुसंस्कारीत मुले घडतील असे श्री. भिला तात्या आहेर यांनी सांगितले.श्री.अशोक मोरे सर,श्रीमती चैताली चंद्रमोरे मॅडम,श्रीमती सांबरे मॅडम,श्रीमती तोरवणे मॅडम,श्रीमती गितांजली परदेशी मॅडम,श्रीमती मंगला धोंडगे मॅडम, श्रीमती स्नेहलता शिंपी मॅडम, श्रीमती विद्या देवरे मॅडम यांनी  मूल्यवर्धन उपक्रमांचा फायदा व इतर विषयाशी कसे निगडीत आहेत व उद्याचा नागरीक घडण्यास ,सुसंस्कारीत होणेस मूल्यवर्धन अधिक उपयुक्त ठरणार, इ.5वी ते 8वी पर्यंत मूल्यवर्धन उपक्रम सुरु करावे. तसेच श्रीमती घोंडगे मॅडम यांनी इ.3 री च्या मुलींनी "मला मुलगी नको" ही नाटीका सादर केली.अतिशय उकृष्ट नाटीका झाली. मा. मुथ्या सोहबांनी कौतुक केले.त्यांचे विचार ऐकून शिक्षकांमध्ये प्रोत्साहन व उत्साह निर्माण झाला.
शाळा - ZPPS Ghoti Girls 1
Cluster - Ghoti  2 
District- Nashik



१० जानेवारी २०१७  - भड़ी (लातूर): मूल्यवर्धन हा रचनावादाला पूरक उपक्रम आहे -  श्री सुर्यकांत येडले, केंद्र प्रमुख 
" मूल्यवर्धनमुळे विद्यार्थी व् शिक्षकांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. तसेच हा उपक्रम रचनावदाला पूरक आहे." असे मत महमदापुर (लातूर )केंद्राचे केंद्रप्रमुख श्री येडले सर यांनी व्यक्त केले. दिनांक १० जानेवारी २०१७ रोजी लातूर जिल्ह्यातील जि. प.शाळा भड़ी येथे मूल्यवर्धन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  
भड़ी शाळेचे मुख्याध्यापक सुवर्णकार सर यांनी  मूल्यवर्धनमुळे मूलं संवेदनशील बनली तसेच त्यांच्यामधे सहनशीलता वाढण्यास मदत झाल्याचे सांगत असताना या उपक्रमामुळे शाळेत आनंदाची निर्मिति झाल्याचे म्हंटले.
" मूल्यवर्धनच्या प्रशिक्षणानंतर माझ्यात सभाधिटपणा आला.रागावर नियंत्रण कसे मिळवायचे याचे उदाहरण जेव्हा मी वर्गात दिल्यावर एका मुलीने ते घरी आईला सांगितले व् कुटुंबातील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला" अशी प्रतिक्रिया मूल्यदुत श्री बोनवले सर यांनी व्यक्त केली. मी व् माझ्या क्षमता या घटकामुळे मुलांमधील नकारात्मकता दूर होण्यास मदत झाल्याचे मूल्यदूत श्री गुत्ते सर यांनी सांगितले.
मूल्यवर्धन मुळे मुलांना त्यांचे नातेसंबंध अधिक स्पष्टपणे समजायला लागले आहेत तसेच सहयोगी खेळातून मुलांना सहकार्य-एकात्मता बंधुभाव रुजन्यास मदत होत आहे अशी भावना  श्रीमती कदम व स्वामी मॅडम यांनी केली. 
श्री शांतिलाल मुथ्था या आढावा बैठकीस उपस्थित होते त्यांनी शिक्षकांशी तसेच मुलांशी संवाद साधला. वर्गात गेल्यावर मुलांनी श्री मुथ्था सरांची मुलाखत घेतली तसेच आपल्या वडिलांची तंबाखू ची सवय मोडण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या हे ही सांगितले, त्याबरोबरच घरातील वाद मिटवण्यासाठी मुलांनी कसा पुढाकार घेतला याबद्दल सांगताना मुलांमधील जबाबदारिची जाणीव दिसून आली, वर्गनियम आम्ही कसे तयार केले व ते कसे पाळतो हे मुलांनी आवर्जून सांगितले. लातुरच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे यांच्याशी श्री मुथ्था सरांची लातूर येथे बैठक झाली यात त्यांनी मूल्यवर्धन मुळे शिक्षकांमधे व् मुलांमधे अमुलाग्र बदल दिसून आल्यामुळे हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात घेऊन जाण्यासाठी 20 मास्टर ट्रेनर ची यादी तयार केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. सुर्यकांत येडले सर, श्री सुवर्णकार सर मुख्याध्यापक भड़ी, श्री सुनील कोचेटा, श्री पोखराज दर्डा, महमदापुर केंद्रातील शिक्षक, पालक व् शाळा प्रबंध समितीचे सदस्य उपस्थित होते.
शाळा - ZPPS BHADI
Cluster - Mahamdapur
District- Latur





१४ जानेवारी २०१७  - आजच्या शिक्षणपद्धतीशी मूल्यवर्धन उपक्रम सुसंगत -रविकिरण बिराडे 

शिरसोली,ता.जि.जळगाव - मूल्यवर्धन उपक्रम आजच्या शिक्षणपद्धतीशी सुसंगत असून तो संपूर्ण तालुक्यात राबवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन जळगाव पंचायत समितीचे  शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिराडे यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या आढावा बैठकीत केले. यावेळी शांतिलाल मुथ्था फौंडेशन ( एसएमएफ) चे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, अनुभूती शाळेच्या निशा जैन, मुथ्था फौंडेशनचे राज्यपदाधिकारी विनय पारखकेंद्रप्रमुख डी.एन.ठाकूर तसेच मूल्यवर्धन उपक्रम सुरू असणाऱ्या शिरसोली केंद्रांतर्गत  नऊ शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
केंद्रप्रमुख ठाकूर यांनी उपक्रमाचा आढावा घेतला.मूल्यवर्धन उपक्रम केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षक- पालकांसाठीही उपयोगी असल्याचे मत यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिकांनी व्यक्त केले.
शांतिलाल मुथ्था यांनी बैठकीपूर्वी इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा  वर्गातील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी तसेच कुटुंबीयांशी  सुसंवाद वाढत आहे. यातूनच पुढे ते जबाबदार नागरिक बनतील असा विश्वास मुथ्था यांनी व्यक्त केला.
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदर दिसत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि राज्यशासनाने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले ही एक ऐतिहासिक घटना आहे, असे अशोक जैन यांनी सांगितले.
मूल्यवर्धन उपक्रम राबवला जात आहे ही चांगली गोष्ट आहे कारण शिक्षकच समाज घडवत असतात असे निशा जैन यांनी सांगितले.
बैठकीत प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अनुक्रमे राजेंद्र पाटील आणि पूनम बागुल यांनी केले. गणेश  बागुल यांनी आभार मानले.

१४ जानेवारी २०१७  - विद्यार्थांशी संवाद साधताना मा.श्री.शांतिलाल मुथ्था.
Cluster - Pimplod

District- Nandurbar


१४ जानेवारी २०१७  - नंदुरबार जिल्हधिकारी श्री.कलशेट्टी साहेब 'आढावा बैठकीत'मार्गदर्शन करतांना.
Cluster - Pimplod
District- Nandurbar

१७ जानेवारी २०१७  - शिक्षणाची वारी, औरंगाबाद 





२७ जानेवारी २०१७  
शाळा - ZPPS WAZUR (BK.)
Cluster - Kekarjawla
District- Parbhani
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  हाताची गाठ  

२८ जानेवारी २०१७  - कानगोष्ट हा खेळ घेतांना.
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL AMSHET
Cluster - Birwadi Kanya
District- Raigarh
इयत्ता - चौथी 
उपक्रम -  सहयोगी खेळ 


२९ जानेवारी २०१७  - तोल संभाळणे हा खेळ घेतांना श्रीम.विद्या देवरे मॅडम
शाळा - Z.P.PRI SCHOOL KHAMBALE
Cluster - Ghoti  2 
District- Nashik
उपक्रम -  सहयोगी खेळ 

३० जानेवारी २०१७  - सहयोगी खेळ अभिनय घेताना वर्ग शिक्षिका श्रीमती. ठाकुर मॅडम
शाळा - Z. P. PRI SCH.DAPORE
Cluster - Shirsoli
District- Jalgaon
उपक्रम -  सहयोगी खेळ 

३१ जानेवारी २०१७  - गटचर्चा व मत व्यक्त करणे 
शाळा - ZPPS Salumbre
Cluster - Darumbre
District- Pune
उपक्रम -  झाडांचे उपयोग, मी व माझे मत