Tuesday, 21 June 2016

Best Remarks By Mulyavardhan Teachers


मार्च २०१६- आपल्याला आनंद केव्हा होतो हे मुले एकमेकांना सांगताना मार्च २०१६- शिक्षणाची वारी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मूल्यवर्धन चे दालन.
१६ मार्च २०१६- जिल्हा परिषद औरंगाबाद येथील मा. CEO यांचे  तपासणी प्रमुख श्री. चौरे साहेब यांनी जि प प्रा शा खोडेगाव येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांना मूल्यर्वधन उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. त्याना  सुट्टीचा दिवस 'हा उपक्रमाचे इयत्ता ३री  निरीक्षण केले. व विद्यार्थ्यानी भरलेली उपक्रम पुस्तीका पाहून सर्व शाळेत हा उपक्रम राबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी औरंगाबाद गटसमन्वयक श्री. न्हावी सर , मूल्यशिक्षक श्री गजानन देशमुख हे उपस्थित होते
१८ मार्च २०१६- पं.स. चे श्री.रणमाळे साहेब यांनी शाळेस भेट दिली.भेटी दरम्यान शाळेची रंगरंगोटी,मुलांची गुणवत्ता,वृक्षारोपण पाहून समाधान व्यक्त केले.तसेच मुल्यवर्धन कार्यक्रम समजावुन घेतला.मुलांची प्रगती पाहून त्याना आनंद झाला.त्या प्रसंगी केकरजवळा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री घटे साहेब 
१९ मार्च २०१६- MLA ' S  MRS.  RAJASHREE  HEMANT  PATIL  VISITED  TODAY  AT  P.S.  KAMTHA  DIST  NANDED.  PARTCIPATED  WITH  STUDENTS  ,  APPRICIATED  THEM  ,  OBSERVED  MULYVARDHAN  PUSTIKA,  DISSCUSSION   WITH  HM, KENDRAPRAMUKH, MV  TEACHERS  and  S.M.C. MEMBERS AND EXPRESSED  VOTE  OF  THANKS  TO  SMF


२१ मार्च २०१६- S.M.C.उपाध्यक्ष सौ उज्वला नागदेवे सौ.सायरे madam श्री गौतम उमक श्री हजारे यांची मूल्यवर्धम वर्गाला भेट हा सूंदर उपक्रम पाहून आनंद व्यक्त व श्री मूल्यवर्धन शिक्षक दिलीप केने केने याना ध्यनवाद दिले
२४ मार्च २०१६- ई—लर्निंग  आणि  मुल्यवर्धन  संदर्भांत पालक सभा  आयोजित करण्यात आली.पालक सभेस   शा.व्य.स चे अध्यक्ष मा.श्री.काशिनाथ धरपडे  सरपंच मा.श्रीरंग हारगुडे मानवत पं.स.चे जेष्ठ शि.वि.अधिकारी मा.श्री.रणमाळे साहेब पाथरी पं.स.चे जेष्ठ शि.वि.अधि.मा.श्री राठोड साहेब. केकरजवळा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.घटे साहेब PDRSP सघटनेचे मा.श्री.भिसे सर तालुका अध्यक्ष मा.श्री.मोहकरे सर, तंत्रस्नेही शिक्षक श्री भवर सर,श्री जाधव सर, श्री बिक्कड सर,श्री शिराळे सर,श्री सय्यद सर, श्री राठोड सर,श्री कोरेबैनवाड सर आणी गावातील पालक महिला माता भगिणी  तरुण मंडळ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पालक सभेस उपस्थित होते. पालक सभेस गावकर्‍यांनी शाळेसाठी भरपूर देणगी दिली.शाळेस १० गुंठे जमिन आणि ३८४०० रुपये एवढी देणगी प्राप्त झाली.PDRSP संघटनेने शाळेस १००० रुपये  दिले.
१३ एप्रिल २०१६- जि.प. मराठी प्राथमिक शाळा तळणी येथे इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी शे. नावेद शे. सिकंदर शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना या विद्यार्थ्याला एक पिशवी सापडली. पिशवीमध्ये २४ हजार रु. चि रक्कम होती. सदर चि पिशवी तळणी गावातील च श्री.  राजेंद्र जनार्दन झोपे यांची होती. या मुलाने सापडलेली पैश्यांची पिशवी आपल्या वडिलांच्या मदतीने  श्री. झोपे यांना परत केली. विद्यार्थ्याच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. जि.प शाळा तळणी येथे शांतीलाल मुत्था फाऊनडेशन तर्फे प्रायोगिक तत्वावर  मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये मुलांवर रुजवण्यात येणाऱ्या मूल्य, संस्कार याचा विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अभय खर्चे यांनी या घटनेवर मत व्यक्त केले. माजी जि.प सदस्य श्री. पुरुषोत्तम नारखेडे यांनी सुद्धा या विद्यार्थ्याचे शाळेत जाऊन कौतुक केले.
 

जून २०१६- विद्या परिषद पूणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पूणे यांचे संयुक्त विध्यमाने आयोजीत तीन दिवशीय केंद्रस्तरीय "मूल्यवर्धन कार्यक्रम " प्रशिक्षण संप्पन्न झाले. या प्रशिक्षणास भवानीनगर केंद्रातील सर्व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला. सदर प्रशिक्षणात कृतियुक्त उपक्रम, विविध आनंददायी सहयोगी खेळ, गटचर्चा, जोडीचर्चा, उपक्रम सादरीकरण, शंकासमाधान, संविधानातील मूल्यांवर आधारीत उपक्रम, अभ्यासक्रमाच्या उद्धीष्टानुसार उपक्रम, आनंददायी शिक्षणावर आधारीत उपक्रम, विविध उपक्रमांचे video clip या आधारीत प्रशिक्षण संप्पन्न झाले.
प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून श्री.अशोक बनसोडे साहेब (केंद्रप्रमुख भवानीनगर), श्री.गिरीश मोकाशी सर, सहशिक्षक रेठरेहरणाक्ष, सौ उज्वला चव्हाण मॅडम,सहशिक्षक भवानीनगर यानी प्रशिक्षण दिले. 


जून २०१६- विद्या परिषद पूणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पूणे यांचे संयुक्त विध्यमाने आयोजीत तीन दिवशीय केंद्रस्तरीय "मूल्यवर्धन कार्यक्रम" प्रशिक्षण संप्पन्न झाले. या प्रशिक्षणास शिंगवेतुकाई  केंद्रातील सर्व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला. सदर प्रशिक्षणात कृतियुक्त उपक्रम, विविध आनंददायी सहयोगी खेळ, गटचर्चा, जोडीचर्चा, उपक्रम सादरीकरण, शंकासमाधान, संविधानातील मूल्यांवर आधारीत उपक्रम, अभ्यासक्रमाच्या उद्धीष्टानुसार उपक्रम, आनंददायी शिक्षणावर आधारीत उपक्रम, विविध उपक्रमांचे video clip या आधारीत प्रशिक्षण संप्पन्न झाले.
प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून श्री.उमेश क्षीरसागर श्री.साबळे .केंद्रप्रमुख श्री .शेलारसाहेब श्री कुलट साहेब .जिल्हा समन्वयक श्री .गिते
यांनी प्रशिक्षण दिले. समारोप प्रसंगी गटशिक्षणाधिकारी 🌹श्रीमती.सामलेटी मॅडम विस्तार अधिकारी श्री साठे साहेब . यांनी प्रशिक्षणास भेट देऊन मूल्यवर्धन कार्यकर्मचि ओळख हा माहिती पट पाहून शांतिलाल मुथा फौंडेशन विषयी गौरोवूदगर काढून हा कार्यक्रम सर्वाना मार्गदर्शक आहे .तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वाना शुभेच्या देऊन .संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्याचा निर्धार व्येक्त केला.
सर्वाना नवीन शैक्षणीक वर्षा साठी शुभेच्या देऊन कार्यक्रमचा समारोप करण्यात आला.१२ जून २०१६- विद्या परिषद पूणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पूणे यांचे संयुक्त विध्यमाने 9 ते 11 जून 2016 दरम्यान आयोजीत तीन दिवसीय केंद्रस्तरीय "मूल्यवर्धन कार्यक्रम " कार्यशाळा केंद्र टेम्भुर्लि तालुका शहापुर जिल्हा ठाणे येथे संप्पन्न झाले. या कार्यशाळेस  टेम्भुर्लि केंद्रातील सर्व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.ही कार्यशाळा पूर्णतः तंत्रस्नेही सहित्याचा वापर (प्रोजेक्टर व  गटनिहाय 6 लैपटॉप) करून देण्यात आले.सदर कार्यशाळेत कृतियुक्त उपक्रम, विविध आनंददायी सहयोगी खेळ, गटचर्चा, जोडीचर्चा, उपक्रम सादरीकरण, शंकासमाधान, संविधानातील मूल्यांवर आधारीत उपक्रम, अभ्यासक्रमाच्या उद्धीष्टानुसार उपक्रम, आनंददायी शिक्षणावर आधारीत उपक्रम, विविध उपक्रमांचे चित्रफिती या आधारीत कार्यशाळा संप्पन्न झाली. कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून श्री.महेंद्र धिमते (केंद्रप्रमुख टेम्भुर्लि), श्री.नितिन हरणे सर, मूल्यदुत शिक्षक कातकारीवाडी टेम्भुर्लि, श्री.दामू हिलम सर, मूल्यदुत शिक्षक कातकारीवाडी टेम्भुर्लि यानी प्रशिक्षण दिले. शांतिलाल मुत्था फाउंडेशन च्या वतीने श्री.बाळासाहेब ठोम्बरे हे निरीक्षक म्हणून उपस्तिथ होते.या कार्यशाळेतील काही क्षण चित्रे
१२ जून २०१६- कें प्रा. शा. कचनेर, ता.औरंगाबाद येथे केंद्रस्तरीय मूल्यर्वधन प्रशिक्षणास औरंगाबाद  जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. मोगल साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. श्री. देशमुख साहेब, पैठण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. कोमटवार साहेब यांनी भेट दिली. याप्रसंगी मा. शिक्षणाधिकारी यांनी मूल्यवर्धन कार्यक्रम का आवश्यक आहे याविषयी अत्यंतमहत्वपूर्ण माहीती दिली व या कार्याविषयी सर्वांना शुभेच्छा देऊन विद्यार्थी हित जोपासा असे आवाहन केले. मूल्यशिक्षक श्री. देशमुख गजानन यांनी मूल्यशिक्षणाविषयी व मुथ्था फ़ाऊंडेशन विषयी माहिती दिली.१३ जून २०१६- दि 13 जून 2016'मूल्यवर्धन कार्यक्रम' केंद्रस्तरीय कार्यशाळेचा तिसरा दिवस. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना  केंद्रप्रमुख श्रीकमलाकर ठाकूर , श्री जाधव श्रीम भाईप श्री घुडे   यांनी नियोजनाप्रमाणे गटकार्य , खेळ , चर्चा या यात केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्तम सहभाग नोंदवला .पहिल्या दिवशी माध्य. शाळेचे सचिव व मुख्याध्यापक झालेल्या कार्यक्रमात गटकार्यात , चर्चेत सहभागी झाले .तालुका गटशिक्षणाधिकारी मा. श्री शिवाजी देसाई साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन  केले  .एकंदरीतच अतिशय आनंदात आणि उत्साहात  प्रशिक्षण सुरु होते .

१३ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा दि.11जून ते 13जून 2016 या काळात ऊत्साहात , आनंदी वातावरणात ,सक्रियसहभागात व खेळीमेळीच्या स्वरूपात संपन्न झाली.


२० जून २०१६- अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर जि बुलडाणा येथे कार्यशाळेचा तिसरा दिवस संपन्न झाला. शिक्षकांचा मूल्यवर्धन कार्यशाळेसमंधी feedback घेतल्यानंतर केंद्रप्रमुख श्री. प्राणकर सर यांनी मार्गदर्शन केले.
👉🏻अशा प्रकारे मूल्यवर्धन कार्यशाळा संपन्न झाली.
सुरुवातीला जि प शाळा तळणी येथे मागील 3 महिन्यात राबवलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांच्या निवडक विडिओ क्लिप दाखवण्यात आल्या.
👉🏻त्यानंतर सराव सत्र घेण्यात आले. 


२१ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी गटात कार्य करतांना व उपक्रमाचे सादरीकरण करतांना केंद्र कोठारी पं स बल्लारपूर जि.चंद्रपूर. समारोपाच्या प्रसंगी शिक्षकांनी मुल्यवर्धन कार्यक्रम अत्यंत उपयोगी आहे.संपूर्ण तालुक्यात सोबतच चालू सत्रातच  सुरू करण्यात यावा जेणेकरून याचा मुलांना लवकर फ़ायदा होईल.अध्ययन साहित्य खूप अभ्यासपुर्वक बनवलेले आहेत असे मत व्यक्त केले.या प्रसंगी नजिकच्या बामणी केंद्राच्या केंद्रप्रमुख अय्यर मॅम उपस्थित होत्या. मा.ग.शि.अ. यांनी कार्यशाळेला भेट देऊन कार्यशाळा व्यवस्थित सुरू असल्याचे समाधान व्यक्त केले.

२२ जून २०१६- "आम्ही असे प्रशिक्षण पहिल्यांदाच अनुभवले,हे प्रशिक्षण इतर प्रशिक्षणा पेक्षा वेगळे होते,हे प्रशिक्षण अतिशय आनंददायी होते,अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे"

४ जुलै २०१६- मूल्यवर्धन कार्यक्रमातील वैशिष्टयपूर्ण उपक्रमांमूळे वर्ग व्यवस्थापन सुलभ झाले आहे.
 

No comments:

Post a Comment